शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मांगूळझनक येथे एलसीबीची जुगारावर धाड; ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:32 IST

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया मांगूळझनक या गावात चालणाºया जुगार अड्डयावर १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया मांगूळझनक या गावात चालणाºया जुगार अड्डयावर १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये मांगूळझनकच्या सरपंचपतीचाही समावेश आहे.शरद मंडलिक नावाचा इसम प्रदिप घोटे (रा.मांगूळझक) यांच्या शेतातील टिनशेडमध्ये जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी पथक तयार करून मांगूळझनक गावाकडे रवाना केले. यादरम्यान पोलिसांचा सुगावा लागताच जुगार खेळणारे लोक शेडमधून पळून जात असताना पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी पाठलाग करून मांगूळझनकचे सरपंचपती दत्तात्रय नारायणराव झनक यांच्यासह शे. युसूफ शे. यासीन, संतोष किसनराव आखाडे (डोणगाव, जि.बुलडाणा), शे.कडू शे. वली, शे.वजीर शे. जलाल (गोहगाव, जि.बुलडाणा), संतोष प्रल्हाद बोरकर (शेलगाव, जि.बुलडाणा), पांडूरंग बळीराम कव्हर (दुधाळा, ता.वाशिम) अशा ७ आरोपींना जेरबंद केले. तसेच रवी नरवाडे (आंचळ, जि.बुलडाणा, शरद मंडलिक, प्रदिप घोटे, पंजाब घोटे (मांगूळझनक) हे चार आरोपी फरार झाले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कैलास इंगळे यांच्या फिर्यादीवरून नमूद ११ ही आरोपींवर शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) जुगार अ‍ॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कामगिरी परिविधाधिन पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील, अतूल मोहनकर, दिनकर गोरे, भगवान गावंडे, किशोर चिंचोळकर, सुनील पवार, प्रेम राठोड, नीलेश इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.मुद्देमालासंदर्भात उलटसुलट चर्चा !मांगुळ झनक येथे  जूगारप्रकरणी ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मात्र आरोपींना शिरपूर पोलीस स्टेशन पर्यंत आणण्यात आले नाही. आरोपींना मांगुळ झनक येथेच समन्सपत्र देऊन सोडून देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या भूमिकेबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. जुगारातून जप्त केलेला मुद्देमालही कमी दाखवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आरोपींवर गुन्हे दाखल करून तथा जागीच समन्स देऊन सोडता येते. मात्र, त्यांच्यावर दाखल केसेस कोर्टात सुरू राहतात. -शिवाजी ठाकरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी