शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वाशिम जिल्ह्यामध्ये वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 12:00 PM

Launch of 'CMP' system for salaries in Washim district : वेतन दरमहा नियोजित वेळेत होण्यासाठी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा ३० जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियोजित वेळेत होण्यासाठी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा ३० जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. यापुढे वेतन दरमहा नियमित होईल, असा आशावाद शिक्षण विभाग व शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, तसेच अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमार्फत होत असल्याने वेतन खात्यावर जमा होण्यासाठी विलंब होत होता. याबाबत शिक्षक संघटनांनी आवाज उठविला तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी चर्चा केली. शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी शिक्षकांच्या वेतनातील विलंब दूर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांनी यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीचे गठन करीत ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम तयार केला. या कामी उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी आकाश अहाळे यांचेही सहकार्य लाभले. अखेर ३० जुलै रोजी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

कर्मचाऱ्यांना दिलासा! शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्यात यावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेला आहे. मात्र, वेतनास दोन- दोन महिने विलंब होत होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.  ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी शिक्षणाधिकारी तांगडे यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे, नीलेश देवकते, सतीश सरनाईक, सुनील कोल्हे यांनी तांत्रिक जबाबदारी पार पाडली. 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद