शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा अभाव; विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:57 IST

एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा (वाशिम) - विद्यार्थी संख्या जास्त असतानाही केवळ एका शिक्षकावर किनखेडा ता. रिसोड येथील जिल्हा परिषद शाळेची जबाबदारी सोपविली आहे. आणखी एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला.मागील वर्षभरापासून तीन शिक्षकी असलेली किनखेडा जि.प. शाळा दोन शिक्षकांवर आली. त्यातील एक शिक्षिका दिर्घ आजारी रजेवर असल्यामुळे एकाच शिक्षकाला ४ वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक करावी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पंचायत समिती, शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप शिक्षक मिळाला नाही. दोन महिन्यापुर्वी असाच आंदोलनात्मक पवित्रा घेतला असता केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांनी १५ दिवसात शिक्षक देतो, असे आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाचे  आदेशही काढण्यात आले. परंतु सदर आदेश हे संबंधित शिक्षकापर्यंत पोहचले आणि तीन दिवसात जलदगतीने चक्रे फिरल्याने शेवटी तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकाचे बदली आदेशही मागे घेण्यात आले. याप्रकरणी शिक्षण विभागावर नेमका कुणाचा दबाव आला? याची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. किनखेडा येथील शाळेवर तात्पुरत्या स्वरुपात एक शिक्षक देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाई धोरणाचा निषेध म्हणून शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला. पालकांचा हा निर्णय शिक्षण विभाग किती गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर रिसोडचे गटशिक्षणाधिकारी खराटे यांच्या घरी लग्नसमारंभ असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. सहा महिन्यांपासून शिक्षक मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहोत. परंतू, शिक्षण विभाग जाणूनबुजून राजकारण करीत आहे. त्यामुळे संघर्ष केल्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेत मुले न शिकवलेली बरे. - ज्ञानेश्वर उत्तमराव अवचार अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती किनखेडा ता. रिसोड

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाTeacherशिक्षक