शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

By admin | Published: May 24, 2017 1:49 AM

प्रशासन हतबल : एक लाखापैकी १७ हजार मजूर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केवळ २०१ रुपये दैनंदिन मजूरीत गुंतून राहण्यापेक्षा खासगीत इमारत बांधकामात दिवसाला ३०० रुपयांपेक्षा अधिक मजूरी मिळते. याशिवाय दररोज पैसा हाती पडतो, या मानसिकतेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर यायला मजूर तयार नाहीत. परिणामी, प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली असंख्य कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात १० हजार ६१४, मालेगाव १५ हजार ५४३, मंगरूळपीर २७ हजार १०३, मानोरा १४ हजार ५१०, रिसोड २२ हजार ७१० आणि वाशिम तालुक्यात १२ हजार ९४७, असे एकंदरित १ लाख ३ हजार नोंदणीकृत जॉबकार्डधारक मजूर आहेत. असे असले तरी सद्या सिंचन विहिर, वृक्षलागवड, रोपवाटिका, शौचालय, शोषखड्डे, घरकुलांच्या सुरू असलेल्या एकंदरित १३२५ कामांवर त्यापैकी केवळ १७ हजार ५३६ मजूरच कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मजूरांकडून कामांची मागणीच नसल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. म्हणायला, शासनाने १ एप्रिलपासून मजूरांच्या मजूरीत ९ रुपये वाढ केली आहे. जॉबकार्डधारक मजूरांना पूर्वी १९२ रुपये प्रतिदिन मजूरी दिली जायची. त्यात ९ रुपयांची वाढ करित शासनाने १ एप्रिल २०१७ पासून दैनंदिन मजूरी २०१ रुपये केली आहे. मात्र, ती देखील तुलनेने कमी असल्याने मजूरांकडून ‘रोहयो’कडे कामांची मागणीच केली जात नसल्याची वस्तूस्थिती आहे.खात्यात पैसे जमा करण्याच्या पद्धतीबाबत नाराजी!अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मजूरांना कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असताना दोनवेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडते. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला सायंकाळी हातात पडायला हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, ‘रोहयो’अंतर्गत मजूरीचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत १ एप्रिल २०१७ पासून अंगिकारण्यात आली असून हा पैसा बँकेतून ‘विड्रॉल’ करणे जिकीरीचे ठरत असल्याने या किचकट पद्धतीबाबत मजूरांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असंख्य कामे मंजूर आहेत. कामांची मागणी झाल्यानंतर तत्काळ मजूरांना काम देखील उपलब्ध करून दिले जाते. मात्र, वारंवार आवाहन करूनही ही कामे करण्याकरिता मजूर उपलब्ध होत नसल्याने सिंचन विहिर, पांदन रस्ते यासह इतरही कामे प्रलंबित राहत आहेत.- सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम