शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:33 IST

महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिरपूर येथे १० मार्च रोजी ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला होता. या महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले.दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या मैदानावर ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला जातो. त्यानुसार या वर्षीही १० मार्च रोजी कुस्त्यांचा महासंग्राम संपन्न झाला. या महासंग्रामाचे उद्घाटन संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्त्याचा महासंग्रामात महाराष्ट्रासह दिल्लीच्या पैलवानांनी ही सहभाग घेतला होता. यामहा संग्रामातील पहिले बक्षीस  उमेश इंगोले, रमेश इंगोले यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये, तसेच गणेश घोडमोडे यांच्यावतीने चांदीची गदा ठेवण्यात आली होती. याचा मानकरी हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा येथील गजानन पैलवान यास चित करून कुरूडवाडीचा महारुद्र काळे हा विजेता ठरला. अयुब ठेकेदार आणि विलास गवळी यांच्या ७१ हजाराच्या बक्षिसाचा मानकरी कुरूडवाडी येथील सागर माटे, प्रशांतनाना देशमुख आणि अरुण कालवे यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ५१ हजाराच्या तिसºया बक्षीसाचा मानकरी हिंगोलीचा ज्ञानेश्वर गादेकर, रमजान रेघीवाले दस्तगीर पैलवान यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ४१ हजारांच्या चौथ्या बक्षीसाचा मानकरी आटपाडीचा संदीप काशीद ठरला. पाचव्या क्रमांकाचा मानकरी वाशिमचा भाऊ पांढरे, सातव्या क्रमांकाचा मानकरी इंदापूरचा सचिन वाघ, सातव्या क्रमांकाचा मानकरी शिरपूरचा शाहरुख, आठव्या क्रमांकाचा मानकरी लोहगावचा ज्ञानेश्वर, नवव्या क्रमांकाचा मानकरी सागर, दहाव्या क्रमांकाचा मानकरी  निमगावचा विजय, तर अकराव्या क्रमांकाचा मानकरी नंदू घोडके हा ठरला. उमेश इंगोले, रमेश इंगोले या भावंडांनी ठेवलेले एक लाख रुपयांचे प्रथम बक्षीस त्यांच्याच हस्ते आणि गणेश घोडेमोडे यांनी ठेवलेली चांदीची गदा हे बक्षीस त्यांच्याच हस्ते विजेता महारुद्र काळे यास देण्यात आले. यावेळी अशोकराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश भालेराव, सुदर्शन गाभणे, आशीष देशमुख, पंजाब नाईक, राजू कुंडलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. कुस्त्यांच्या महासंग्राम यशस्वी आयोजनासाठी ओंकारगीर कुस्तीगीर मंडळाचा पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले, तर संभाजी नवयुवक मंडळाच्यावतीने कुस्त्यासाठी आलेल्या राज्यभरातील पहिलवान व त्यांच्या सहकाºयांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था केली होती.

टॅग्स :washimवाशिमWrestlingकुस्तीShirpur Jainशिरपूर जैन