शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोटा येथील खुन प्रकरणातील आरोपींना वाशिमच्या दर्ग्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 13:48 IST

खून प्रकरणातील आरोपींचे कोटा टू वाशिम दर्गा कनेक्शन जुळलेच कसे ? दर्ग्यात त्यांना १४ ते १५ दिवस आश्रय कसा मिळाला आणि तो कुणी दिला? यासह इतरही अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राजस्थान राज्यातील कोटा शहरात एका इसमाचा बंदूकची गोळी मारून खून केल्यानंतर इतरही काही नागरिकांवर फायरिंग करून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ जानेवारीला टिळक उद्यानासमोरच्या मोकळ्या मैदानातील दर्गामधून पिस्तुलासह अटक केली. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपींचे कोटा टू वाशिम दर्गा कनेक्शन जुळलेच कसे ? दर्ग्यात त्यांना १४ ते १५ दिवस आश्रय कसा मिळाला आणि तो कुणी दिला? यासह इतरही अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.  राजस्थान राज्यातील कोटा शहरात असलेल्या कैथुनीपोल पोलिस स्टेशनअंतर्गत अमन बच्चा नामक इसम व त्याच्या साथीदारांनी एका इसमाची बंदूकची गोळी मारून हत्या केली. यावेळी मध्यस्थी करणाºया इतरही काही इसमांवर त्यांनी फायरिंग करून पोबारा केला. कैथुनीपोल पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला; मात्र सुगावा लागला नाही. यादरम्यान सदर आरोपी वाशिम शहरातील टिळक उद्यानासमोर असलेल्या मोकळ्या मैदानातील दर्गामध्ये लपून असल्याची गोपनिय माहिती कैथुनीपोल पोलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी वाशिम पोलिसांच्या मदतीने शहानिशा केली असता, दर्गामध्येच आरोपी आढळून आले. अमनअली एहसानअली, मो. इसरद शब्बीरखान (दोघेही रा. साजीदयाना, कोटा, राजस्थान), गोलू उर्फ जावेद हुसेन (रा. जलावाड, राजस्थान), मो. उमर मो. चाँद (रा. पुरानी सब्जीमंडी, कोटा, राजस्थान) या चार आरोपींसह मो.सलीम मो.सोफी (रा. डाफणी पुरा, कारंजा लाड, जि.वाशिम) अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली. सदर आरोपी वाशिमच्या दर्गामध्ये गत १४ ते १५ दिवसांपासून तळ ठोकून होते, हे पोलिसांकडूनच कळले.दरम्यान, वाशिम ते कोटा हे अंतर रेल्वेने १०५७; तर वाहनाने ७०७ किलोमिटर आहे. असे असताना एका इसमाची हत्या करून इतक्या दुरवरून तेथील आरोपी वाशिममधील दर्गामध्ये आश्रयास येतात आणि येथेच १४ ते १५ दिवस तळ ठोकून राहतात, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. पोलिस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यानिमित्ताने सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. वाशिम पोलिसांची कारवाई कौतुकास्पद!हत्या प्रकरणातील आरोपी दर्गामध्ये लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी २८ पोलिस कर्मचाºयांचे दोन विशेष पथक तयार करून अत्यंत शिताफीने दर्गामध्ये २४ जानेवारीला धाड टाकली. यावेळी पाचही आरोपींना अटक करून कैथुनीपोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एकाठिकाणी गुन्हा केल्यानंतर आरोपी इतरत्र पळून जाऊन आश्रय घेतात. विशेषत: छोटी शहरे यासाठी निवडली जातात. कोटा शहरातील कैथुनीपोल येथे इसमाची हत्या करून आरोपींनी स्थानिक काही लोकांच्या मदतीने दर्गामध्ये आश्रय घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम