लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजल्या जाणाºया प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत राज्यभरातील ८१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड झाले आहेत. असे असले तरी आतापर्यंत त्यातील काहीच शेतकºयांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झाली असून आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या योजनेची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यभरातील ८१ लाख शेतकºयांचे अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झाले आहेत. प्रती हप्ता २ हजार रुपये याप्रमाणे संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये तीन हप्त्यांची रक्कम जमा केली जाणार आहे; मात्र अगदीच संथ गतीने सुरू असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे अद्याप राज्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अशातच सद्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ आॅक्टोबर रोजी निवडणूक आणि त्यानंतरही या प्रक्रियेत बराच मोठा कालावधी जाणार असल्याने पात्र शेतकºयांना लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजना ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST