शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:40 IST

वाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

ठळक मुद्देखरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली.यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीसाठी १ लाख १ हजार ४६ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पुरेशे बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४४ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून कृषी विभागाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात खतही उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली असल्याचे दिसून येते. यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.कळंबा  महाली परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली आहेत. या परिसरात दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.१५ जूनपूर्वी झालेल्या पावसाने या परिसरात पेरण्यांस सुरुवात झाली. २० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या आटोपल्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा समाधानकारक पाऊस झाल्याने  पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे या परिसरातील सर्वच पिकांत डवरणी करण्यात आली. कळंबा महाली येथील पूस नदीला पूरही आला होता. त्यामुळे परिसरातील गाव तलाव, विहीरी व बोअरवेल्सला पाणी आले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी