मंगरुळपीर तालुक्यात होणार ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:02+5:302021-06-18T04:29:02+5:30

मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ६० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड होणार आहे. त्यासाठी बी- बियाणे, खते ...

Kharif sowing will be done on 60345 hectares in Mangrulpeer taluka | मंगरुळपीर तालुक्यात होणार ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी

मंगरुळपीर तालुक्यात होणार ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी

Next

मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ६० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड होणार आहे. त्यासाठी बी- बियाणे, खते व इतर शेतीसाहित्य खरेदीसाठी शेतकरी शहरातील व तालुक्यातील ठिकठिकाणच्या कृषी केंद्रांवर धाव घेत आहेत.

तालुक्यात खरीप पीक लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र ६१ हजार ४४३ हेक्टर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निर्माण होणारे पावसाळी वातावरण, अधुनमधून पडणारा पाऊस, वेळेवर पाऊस पडणार असल्याबाबत तज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे उरकून घेऊन बी - भरणाच्या तयारीला लागले.

तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ६१ हजार ४४३ हेक्टर असून बराच भाग डोंगराळ असल्याने या भागातील शेतजमीन हलकी व मुरमाड आहे. त्यातच सिंचन व्यवस्था नगण्य आहे. त्यामुळे बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस ही नगदी पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे हळद, सूर्यफूल व इतर गळीत धान्याची पिके घेतली जातात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. याप्रमाणे तूर ९३२० हेक्टर, मूग ९०८ हेक्टर, उडीद १२३५ हेक्टर, सोयाबीन ४६,५१० हेक्टर आणि कापूस १४३० हेक्टर, तर ज्वारी २३२, ऊस १५, भाजीपाला ४५०, हळद २४५ हेक्टर अशा एकूण ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. गतवर्षी ४६०५० हेक्टर असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली असून यावर्षी ४६,५१० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. मात्र गतवर्षी कपाशीचे पीक समाधानकारक येऊनही ऐनवेळी झालेली अतिवृष्टी व विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे हाती आलेल्या पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. त्यामुळे यावर्षी सरकीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसत आहे. यंदा कापसाचे क्षेत्र कमी होत आहे, तर दहा तारखेला मुसळधार पाऊस पडल्यामुळे, शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने याआधी करण्यात आले होते. परंतु सध्या पेरणीसाठी योग्य वातावरण असून शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया...

मंगरुळपीर तालुक्यात सध्या ९९६ मेट्रिक टन खते, तर ३५७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. सध्या सोयाबीन बियाणाचा तुटवडा असून जवळपास दहा टक्केच शेतकरी वंचित आहेत.

- आर. जी. मोघाड, कृषी अधिकारी, पं. स. मंगरुळपीर

Web Title: Kharif sowing will be done on 60345 hectares in Mangrulpeer taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.