शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:37 IST

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १८.४० टक्के पीक कर्ज वाटप होणे शक्य झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीप्रमाणेच याहीवर्षी खरीप पीक कर्ज घेणाºया शेतकºयांचा आकडा अगदीच कमी झाला असून यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १८.४० टक्के पीक कर्ज वाटप होणे शक्य झाले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना १५०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अखेरपर्यंत केवळ ३३७ कोटींचे (२३ टक्के) वितरण झाले. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यापैकी मंगळवार, ९ जुलैपर्यंत २८१ कोटी अर्थात १८.४० टक्केच पीक कर्जाची उचल शेतकºयांकडून करण्यात आली आहे. सन २०१८ मध्ये तुलनेने कमी पर्जन्यमान झाले. यामुळे खरीप हंगामापासून शेतकºयांना विशेष उत्पन्न घेता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने अनेक शेतकºयांनी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आधीच्या कर्जाची फेड केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळणे अशक्य झाल्यानेच मागणी घटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दुसरीकडे काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज वितरणास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचीही ओरड होत आहे. बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्टजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमिळून ५०४ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले असून अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडीयन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, देना बँकेला ७१४.२० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट मिळालेले आहे. यासह अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय व आयडीबीआय अशा चार खासगी बँकांना ७७.७० कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले असून ९ जुलैपर्यंत केवळ २८१ कोटींचे वाटप शक्य होऊ शकले आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी