शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खैरखेड्यातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:02 IST

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे.

- यशवंत हिवराळेराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे पशुपालकांनी आपली जनावरे जंगलात मोकाट सोडली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.डोंगरावळ व खडकाळ भागात वसलेल्या खैरखेडा येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गावकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांची उपजिविका ही शेतीवरील कामावर आधारीत आहे. शेतीसिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे संपल्यानंतर रोजगारासाठी गावकºयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात गावातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून, दूरवरून नदीपात्रातील झिºयातून दूषित पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागत आहे. चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी लगतच्या जंगलात जनावरे मोकाट सोडली आहेत. खैरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाण्यासाठी गावकºयांची पायपिट सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकºयांनी केली.

सध्या खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खैरखेडा भागात सिंचन प्रकल्प उभारणे, रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा

खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.संजय राठोड, ग्रामस्थ खैरखेडा

खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. दूरवरून दूषित पाणी आणून तहान भागविण्याची वेळ आम्हा गावकºयांवर आली आहे.- कनिराम राठोड, ग्रामस्थ, खैरखेडाचारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक पशुपालकांनी जंगलात जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी गावकºयांची अपेक्षा आहे.-दिलीप आडे, ग्रामस्थ खैरखेडा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई