शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाल्ल्यांच्या भविष्यासाठी सरसावले पालक; लोकप्रतिनिधींच्या दारात दिली धडक

By सुनील काकडे | Updated: May 15, 2023 17:25 IST

वाशिमातील केंद्रीय विद्यालयासाठी इमारत मागणीचा लढा तीव्र

वाशिम : देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयाची वाशिममध्ये मात्र पार दयनिय अवस्था झाली आहे. पाच वर्षांपासून येथे जुन्या तथा जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेल्या या विद्यालयास हक्काची इमारत अद्याप मिळालेली नाही. राज्य सरकारच्या गचाळ कारभारामुळे उद्भवलेला हा प्रश्न पालकांच्या जिव्हारी लागला असून याविरोधात लढा उभारण्यात आला आहे. त्यानुषंगाने १५ मे रोजी पालकांनी सामूहिकरित्या आमदार लखन मलिक आणि अमीत झनक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली.

वाशिम शहरात २०१८ मध्ये केंद्रीय विद्यालय सुरू झाले. यामुळे विशेषत: माजी सैनिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोबतच ‘आरटीई’मधून सर्वसामान्यांच्या मुलांनाही विद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा असल्याने त्यांच्यातूनही आनंद व्यक्त झाला. दरम्यान, विद्यालयाची सुसज्ज इमारत उभी होत नाही, तोपर्यंत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या जागेत असलेल्या जुन्या टिनपत्र्याच्या इमारतीत विद्यालय चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीच दिवसांत इमारतीसाठी निधी मिळून प्रश्न मार्गी लागेन, अशी शक्यता होती; मात्र पाच वर्षे उलटूनही इमारतीसाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

जिल्हा प्रशासनाने केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीसाठी ‘एफ क्लास’ची जागा राखून ठेवली; मात्र या जागेचा आधी मोबदला अदा करा, अशी आडकाठी राज्य शासनाने घातली आहे. ही बाब केंद्रीय विद्यालय संघटनला मान्य नाही. तसेच जागेचा तिढा सुटत नसेल तर विद्यालयाची मान्यता रद्द करावी लागेन, असा इशारा भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने दिला आहे. विद्यालय बंद झाल्यास मुलांना कुठे शिकवायचे? त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय होणार? यासह इतर स्वरूपातील प्रश्न पालकांनी लोकप्रतिनिधींसमोर उपस्थित केले. आमदार या नात्याने अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणीही पालकांकडून करण्यात आली.जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा खालावला

गेल्या ४ वर्षांपासून ‘आकांक्षित’चे ओझे खांद्यावर पेलत असलेला वाशिम जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत आजही माघारलेलाच आहे. आकांक्षित जिल्ह्यांचा विकास साधण्यासंबंधीच्या पाच पॅरामिटर्समध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची बाब नमूद असताना प्रशासकीय यंत्रणा आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात कुठलेही ठोस प्रयत्न केले नाहीत.

५००  विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

शासनाचीच शाळा असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीकरिता जिल्हा प्रशासनाने ‘एफ क्लास’ची जागा राखून ठेवली. इमारत उभारण्याकरिता केंद्रीय विद्यालय संघटनेने कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे; मात्र राज्य शासन विनामूल्य जागा देण्याबाबत उदासिन आहे. या समस्येमुळे विद्यालय बंद झाल्यास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीwashimवाशिम