शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा पोलिसांनी १.१५ लाखांचा गुटखा पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:49 IST

कारंजा लाड: स्थानिक शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महात्मा फुले चौकस्थित शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात धाड टाकून १ लाख १५ हजार ९00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २ जानेवारीला करण्यात आली.

ठळक मुद्देकारंजा पोलिसांनी महात्मा फुले चौकस्थित एका दुकानात टाकली धाड

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: स्थानिक शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महात्मा फुले चौकस्थित शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात धाड टाकून १ लाख १५ हजार ९00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २ जानेवारीला करण्यात आली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बोडखे, उपनिरीक्षक भगवान पायघन, कैलास ठोसरे, महेश पाटेकर, किशोर चिंचोळकर, अनिल राठोड, रामराव लडके, फिरोज खान, अश्‍विन जाधव यांच्या पथकाने शहरातील महात्मा फुले चौकातील शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात छापा मारला असता, त्या ठिकाणी पांढर्‍या पोत्यांमध्ये साठवून ठेवलेला गुटखा आढळून आला. त्याची किंमत १ लाख १५ हजार ९00 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दुकान मालक इर्शाद अली रजा अली (वय ४८ वर्षे, रा. रंगारीपुरा) यास ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीकरिता हे प्रकरण सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला यांच्याकडे वर्ग करण्यात आले.  

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा