शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा निवडणूक निकाल : राजेंद्र पाटणींनी गड कायम राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:32 IST

Karanja Vidhan Sabha Election Results 2019: आमदार राजेंद्र पाटणी यांना ७३२०५ मते मिळालीत.

- दादाराव गायकवाड कारंजा: अगदी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून सातत्याने संभ्रम वाढविणाºया कारंजा-मानोरा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांचा तब्बल २२ हजार  ७२४ मतांनी पराभव करून या मतदार संघात सलग दुसºयांदा विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे जनतेने विकासाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.  विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर कारंजा मतदारसंघात मत विभाजनाचा फटका प्रमुख दावेदारांना बसणार, स्थानिक उमेदवाराला मतदार प्राधान्य देणार,  परिवर्तन होणार अशा प्रकारच्या चर्चांना सर्वत्र ऊत आला होता. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीला लढत नेमकी कोणात होणार हे चित्र स्पष्ट नव्हते. तथापि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कारंजा मतदारसंघातील लढत ही भाजपाचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके आणि बहुजन समाज पार्टीचे मो. युसूफ पुंजांनी या तिघातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या निवडणुकीत कारंजा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. भाजपने महायुतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ आपल्याकडेच राखत राजेंद्र पाटणी यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर दुसरीकडे कारंजा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूक असलेले प्रकाश डहाके यांना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यावर गेल्याने मोठा धक्का बसला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी त्यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर गतवेळी भारीप बमसंकडून लढलेले  मो. युसुफ पुंजांनी यांनी वंचित बहुजन आघाडीने तिकिट नाकारल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे तिकिट मिळवित निवडणूक लढविली. दरम्यान, हा मतदारसंघ भाजपाला गेल्याने प्रकाश डहाके यांच्या प्रमाणेच शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले डॉ. सुभाष राठोड यांनी मनसेची वाट धरली, तर वंचित बहुजन आघाडीने राजकारणात नवखेच असलेले डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी दिली. यात राजेंद्र पाटणी यांनी गत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आधार घेऊन मतदारांना पुन्हा विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले, दरम्यान, या मतदारसंघासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश डहाके यांच्या पाठीशी असल्याची चर्चा मतदारसंघात पसरली; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाल्याचे दिसले नाही. या निवडणुकीत प्रकाश डहाके यांना ५० हजार ८४१ मते मिळाली, तर तिसºया क्रमांकावर राहिलेले बसपाचे मो. युसूफ पुंजानी यांना ४१ हजार ९०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राम चव्हाण आणि मनसेचे डॉ. सुभाष राठोड यांना मात्र विशेष छाप पाडता आली नाही.

टॅग्स :karanja-acकरंजाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rajendra Patniराजेंद्र पाटणी