लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : आषाढी एकादशीनिमित्त कोणी पायदळ, कोणी दिंडीत तर कोणी पालखी सोहळयासोबत पंढरपूर वारी करतांना अनेकजण जातात. कामरगाव येथील चार भक्त चक्क लुना या मोटारसायकलने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ , स्वच्छतेचा संदेश देत पंढरपुरवारीसाठी निघाले आहेत.कामरगाव येथील रहिवासी सुभाष डोईफोडे हे आपल्या लुना मोटारसायकलने दरवर्षी पंढरपूर वारी करतात. यावर्षी त्यांनी एकटे न जाता सोबत काही सहकारी घेवून जात आहेत. यासाठी त्यांनी स्वत:हून दोन लुनावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे फलक लावून निघाले आहेत. जेथे मुक्काम होईल तेथे बेटीचे महत्व नागरिकांना विषद करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. सुभाष डोईफोडे हे लुना क्रमांक एम.एच. २७- क्यू. ९७४० व एम.एच. २७ क्यू. ६१२१ने कारंजा, वाशिम, हिंगोली मार्गे पंढरपूरसाठी रवाना झाले असून ते कामरगावहून पंढरपूर हा ५८० किलोमिटरचा प्रवास ६ ते ८ दिवसात पूर्ण करणार आहेत. त्यांच्यासोबत गजानन राऊतकर, सुरेश धुमाने, नागपूर येथील वासुदेव लिचडे यांचा समावेश आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:28 IST
कामरगाव येथील चार भक्त चक्क लुना या मोटारसायकलने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ , स्वच्छतेचा संदेश देत पंढरपुरवारीसाठी निघाले आहेत.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी!
ठळक मुद्देस्वत:हून दोन लुनावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे फलक लावून निघाले आहेत. कामरगावहून पंढरपूर हा ५८० किलोमिटरचा प्रवास ६ ते ८ दिवसात पूर्ण करणार आहेत.