महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष शैलजा श. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात कैदी, बंद्यांकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुप्रिया देशमुख, पी.एम. कांबळे, कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी जामीन आणि कैद्यांचे अधिकार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कांबळे यांनी ‘प्ली बार्गेनिंग’ अर्थात विनंती सौदा या विषयावर मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक पाडुळे यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी भि.ना. राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा कारागृहातील कैदी, बंदी उपस्थित होते.