शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला; वाशिम येथे आरक्षण महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 13:45 IST

वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याच्या अनुषंगाने ७ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे समाजबांधवांनी बैठक घेत पुढील रुपरेषा निश्चित केली.भारतीय राज्यघटनेत कलम ३४२(१) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनूसूचित जमातीच्या यादीत ओरॉन, धनगर (धनगड) जमातीचा समावेश असून येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रात ‘धनगड’ अस्तिवात नसताना ‘धनगर-धनगड’ वेगवेगळ्या जमाती असल्याच्या ठरवून गेली ६५ वर्षापासून धनगर जमातीला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले, असा आरोप करीत धनगर समाजबांधवांनी आरक्षणासाठी आता एल्गार पुकारला आहे.आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील कित्येक वर्षांपासून धनगर समाजबांधवांकडून मोर्चे, धरणे, रस्तारोको, निवेदने आदी प्रकारातील  आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधन्याचे प्रयत्न झाले. मागील २०१४ निवडणूकीपुर्वी सत्तेतील भाजपा युती सरकारने  धनगर आरक्षण प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावू, असे आश्वासित केले होते. सरकारची  ४ वर्ष उलटूनही आरक्षण अंमलबजावणीसाठी कुठलाही ठोस निर्णय अद्याप घेतला नाही. या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारी २०१९ रोजी धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात बैठका घेतल्या जात असून, ७ जानेवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे बैठक घेण्यात आली. या महामेळाव्यास धनगर  समाजातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,असे मान्यवरांनी सांगितले. वाशिम येथील आरक्षण महामेळाव्यास धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने हजर राहून समाजाची एकजुट दाखवावी असे आवाहन वाशिमचे नगरसेवक बालु मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किसनराव मस्के, रवी लांभाडे, सुभाषराव शिंदे, बंडू वैद्य, विलास लांभाडे, बबनराव मिटकरी, महादेव लांभाडे, डॉ.गजानन ढवळे, मदनराव कोल्हे, विनोद मेरकर आदींनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमDhangar Reservationधनगर आरक्षण