शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 2:39 PM

एसटी महामंडळामार्फत ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वाहकांकडून होणारा अपहार नियंत्रित करण्यासह प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. या अंतर्गत प्रवासासाठी बस निघण्याच्या १५ मिनिटेपूर्वी संबंधित बसस्थानकाच्या फलाटावर बस उभी करून आरक्षीत आणि अनारक्षीत प्रवाशांची नोंद नियंत्रण कक्षाद्वारे केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक १२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे.प्रवासी भारमानात किंवा संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळामार्फत ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या पद्धती अंतर्गत बसस्थानकावर आलेल्या बसेसमध्ये प्रथम तिकिट घेऊनच प्रवास सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. यामुळेच महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व विभागांना ही कार्यपद्धती त्वरीत कार्यान्वित करण्याबाबत सुचना देण्याचे निर्देश दिले आहेत. या पद्धतीत कोणतीही बस मार्गावर जाण्यापूर्वी प्रथम १५ मिनिटे फलाटावर उभी करण्यात येणार आहे. यावेळी बसमध्ये आरक्षीत प्रवाशांना त्यांच्या आसनावर बसण्याच्या सुचना देण्यासह आरक्षण तिकिटाशिवास बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बसस्थानकावरच ईटीआय मशीनमधून तिकिटे देऊन वाहतूक नियंत्रण नोंदवहीवर त्या बसमधील प्रवाशांच्या संख्येची नोंद केली जाणार आहे. या पद्धतीमुळे वाहकांना अपहार करण्याची संधी मिळणार नसून, प्रवाशांनाही महामंडळाच्या कामकाजाबाबत आपुलकी वाटणार आहे. सर्व विभाग नियंत्रकांना या कार्यपद्धतीचा अवलंब करून माहिती सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.अवलंबातील दिरंगाईची घेणार गंभीर दखलएसटी महामंडळाच्या सर्व विभागांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आगारातील सर्व चालक, वाहक व वाहतूक नियंत्रकांना इश्यु व स्टार्ट कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन सदर सुचना मिळाल्याची खात्री करून संबंधितांची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्याचे निर्देश महामंडळाने दिले असून, या कार्यपद्धतीच्या अमलबजावणीत दिरंगाई झाल्याचे आढळल्यास महामंडळाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.   ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीची अमलबजावणी करण्याच्या सुचना महामंडळाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सर्व आगारप्रमुखांना या कार्यपद्धतीची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येतील.-चेतना खिरवाडकर,विभाग नियंत्रक,रा.प.म. अकोला विभाग

 

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी