शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:00 IST

शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर आगाराची नांदखेडा, शेदुरजना मोरे मार्गे मंगरूळपीर-पिंजर ही बस शाळेच्या वेळेत पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विद्यार्थिनींनी शेलुबाजार येथे बसमध्ये चढून एकाही प्रवाशाला बसमधून खाली उतरू दिले नाही. सदर बस सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर विद्यार्थिनींना परत शेलुबाजार येथे सोडून देण्यात आले.अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी परिसरातील शेंदूरजना मोरे,नांदखेडा या गावातील विद्यार्थीविद्यार्थींनी या बसने शेलूबाजार येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. या गावातील विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय इतर पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. परंतु महामंडळाची बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला. त्यामुळे स्थानिक शेलुबाजार चौकात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मदतीने बस मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आली. तिथे संबंधित आगार प्रमुखांना बोलावून विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखासमोर समस्या मांडल्या. यापुढे दररोज वेळेच्या आत बस पोहचविण्याची मागणी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद लांभाडे यांच्यासह पालक उपस्थित होते.शाळा सुटेपर्यंत बस शाळेसमोरच उभीशेलूबाजार येथील सर्व विद्यार्थ्यांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनला घेवून गेलेली बस विद्यार्थिनींना सोडण्यासाठी शेलूबाजार येथे परत आली आणि शाळा सुटत नाही, तोवर शाळेच्या समोरच उभी होती. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थांना घेवून अंदाजे ५ वाजता पिंजरकडे रवाना झाली.मानव विकास मिशन अंतर्गतविद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विशेष गाड्या प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या.परंतु महामंडळाने मानव विकासच्या उद्देशाला हरताळ फासत या गाड्या प्रवाशी वाहतूकीसाठी इतरत्र वापरत विद्यार्थ्यांना वाºयावर सोडले. याआधीही गाडी उशीरा येत असल्याने तिनवेळा थेट मंगरूळपीर आगार गाठून तक्रार केली होती. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळेच्या वेळेत बस पोहचत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारू. - निकीता डगवाल, विद्यार्थीनी, शेंदूरजना मोरे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरStudentविद्यार्थी