शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:02 IST

प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जवळपास २० वर्षांपूर्वी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जि.प. लघूसिंचन विभागाकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाला; परंतु दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. आता या प्रकल्पातील गाळाचा तातडीने उपसा करून खोली वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्यावतीने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा निधीही उपलब्ध केला; परंतु अस्तित्वात असलेल्या साधनांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नव्या योजनांचा शेतकºयांना फायदा होत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रकल्पातील गाळाचा उपसा झालेला नाही. आधीच अवर्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रकल्पांत पुरेसा जलसंचय होत नाही. त्यात गाळ साचल्याने खोली कमीही झाली आहे. अशातही या प्रकल्पांतून गाळाचा वारेमाप उपसा होत नाही. पाणी उपशावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. नियोजनाची अमलबजावणीही कागदोपत्रीच राहते. त्यामुळे प्रकल्प हिवाळ्यांतच तळ गाठतात. अशीच स्थिती मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील प्रकल्पाची झाली आहे. २० वर्षांच्यापूर्वी उभारलेल्या या प्रकल्पावर शेकडो हेक्टर सिंचन केले जाते. तथापि, या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रासह साठवण क्षेत्रात मोठा गाळ साचला असून, झुडपांचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची साठवण क्षमता खूप कमी झाली असून, शेतकºयांना आता या प्रकल्पाचा पूर्वीसारखा फायदा होत नाही. हा प्रकल्पाने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तळ गाठला आणि आता हा प्रकल्प पूर्ण कोरडा पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानातून या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून त्याची खोली वाढवावी, अशी मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प