शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘पैनगंगे’त मुबलक जलसाठा असूनही विजेअभावी सिंचन अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:52 IST

विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून ‘बॅरेजेस’ उभारण्यात आले. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. तथापि, बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असले तरी विजेची सोय अद्यापपर्यंत उपलब्ध न झाल्याने पाण्याचा वापर होणे अशक्य झाले आहे.जिल्ह्यात सिंचनाचा असलेला अनुशेष दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. सन २०१६ च्या अखेर बॅरेजेसची कामे पूर्ण झाली. तेव्हापासूनच खºयाअर्थाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाकरिता नदीतील पाण्याचा वापर करता येणे क्रमप्राप्त होते; परंतु विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ३८ कोटींचा निधी उपलब्ध देखील करून दिला. त्यातून ९ उपकेंद्र निर्माण केली जात आहेत; मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून आगामी अनेक महिने ते पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प