शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दायित्वाच्या नावावर सेसफंडाच्या निधीत अनियमितता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:07 IST

दायित्वाच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील (स्वमालकीचा निधी) निधीचा वापर करण्यात अनियमितता झाली असून, हा निधी अन्यत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप वाशीम जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांची तक्रारजिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दायित्वाच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील (स्वमालकीचा निधी) निधीचा वापर करण्यात अनियमितता झाली असून, हा निधी अन्यत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप वाशीम जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱऱ्यनादेखील निवेदन दिले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या आगामी दौऱ्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही ठाकरे यांनी मंगळवारी दिला.जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या असलेल्या सेस फंडातून दायित्वाच्या नावावर लाखो रुपयांचा निधी खर्च करता येत नाही, असा मुद्दा उपस्थित करून हेमेंद्र ठाकरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे प्रश्नावलीच सादर केली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सेसफंडातून दायित्वाच्या नावावर आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च केला असून, हा खर्च कोणत्या नियमात बसतो, याची सविस्तर माहिती ठाकरे यांनी मागितली आहे. सन २०१३-१४ मध्ये २०५९ सार्वजनिक मालमत्ता रक्षण या शिर्षाखाली सुधारीत अंदाजपत्रक प्रमाणे ६० लाख २६ हजार ८१७ रपयाचे नियोजन मंजूर करण्यत आले होते. त्यापैकी किती निधी ३१ मार्चअखेरपर्यंत खर्च करण्यात आला. हा खर्च कोणकोणत्या कामावर किती प्रमाणात झाला, कामाच्या प्रशासकीय मान्यता अधिकाºयाच्या प्रती देण्यात याव्या, अंदाजपत्रकानुसार मंजूर निधीपैकी किती निधी अखर्चित राहिला, याची माहिती निवेदनाद्वारे मागितली आहे. सन २०१३ -१४ मध्ये ३०५४ या शिर्षाखाली ग्रामीण रस्ते देखभाल दुरूस्ती, सन २०१४ -१५ मध्ये २०५९ या शिर्षाखाली सार्वजनिक मालमत्ता रक्षण, सन २०१४ -१५ मध्ये ३०५४ या शिर्षाखाली ग्रामीण रस्ते देखभाल  दुरुस्ती, सन २०१५ -१६ मध्ये २०५९ या शिर्षाखाली सार्वजनिक  मालमत्ता रक्षण, सन २०१५ -१७ मध्ये ३०५३ या शिर्षाखाली ग्रामीण रस्ते देखभाल दुरुस्ती, सन २०१६ -१७ मध्ये २०५९ या शिर्षाखाली सार्वजनिक मालमत्ता रक्षण, सन २०१६-१७ मध्ये ३०५४ या शिर्षाखाली ग्रामीण रस्ते देखभाल दुरूस्ती आदी शिर्षाखाली लाखो रुपयांचा निधींचे नियोजन सुधारीत अंदाजपत्रक प्रमाणे मंजुर करण्यात आले होते. त्यापैकी किती निधी ३१ मार्चअखेर पर्यंत खर्च करण्यात आला. हा खर्च कोणकोणत्या कामावर किती प्रमाणात झाला, कामाच्या प्रशासकीय मान्यता अधिकाºयाच्या प्रती देण्यात याव्या, अंदाजपत्रकानुसार मंजूर निधीपैकी किती निधी अखर्चित राहिला, याची माहिती हेमेंद्र ठाकरे यांनी निवेदनाद्वारे मागितली आहे.सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसंदर्भातही प्रश्नावलीसन २०१७ -१८ मध्ये २०५९ सार्वजनिक मालमत्ता रक्षण याकरिता मुळ अंदाजपत्रक प्रमाणे १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांचे नियोजन मंजुर करण्यात आले होते. त्याचे नियोजन आजपर्यंत करण्यात आले नाही असा आरोप करण्यात आला. नियोजन मंजूर नसल्याने त्यामधून कोणताही खर्च सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय करता येत नाही. तरीपण त्यापैकी किती निधी आजपर्यंत दायित्वाचे नावावर खर्च करण्यात आला. तो खर्च  कोणत्या नियमाने करण्यात आला त्याची माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावे,  अशी मागणी हेमेंद्र ठाकरे यांनी केली.जिल्हा परिषद वर्तुळात खळबळजिल्हा परिषदेच्या सेस फंडाचे नियोजन केल्यानुसार, सदर निधीच्या वित्तीय वर्षाचे त्याच वित्तीय वर्षात म्हणजे मार्च महिन्याअखेर पर्यंत खर्च करणे अपेक्षीत असते. त्यापैकी अखर्चित  राहिलेला निधी पुढील वर्षात दायित्वाचे नावाने खर्च करता येत नाही, असे निवेदनात नमूद करीत मागील २०१३ -१४ पासून ते सन  २०१७ चे मुळ अंदाज पत्रकामधून दायित्वावर खर्च करण्यात आला आहे. दायित्वाच्या नावावर हा खर्च कोणत्या नियमाने करण्यात आला तसेच सेस फंड याकरिता दायित्व राहते का, दायित्व राहत असेल तर कोणत्या नियमानुसार राहते, आदीसंदर्भात माहिती विचारून हेमेंद्र ठाकरे यांनी पंचायत राज समितीच्या दौºयापूर्वीच जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.जिल्हा परिषद प्रशासनाला तक्रार प्राप्तजिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, त्या अनुषंगाने त्यांना माहिती पुरविली जाईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमzpजिल्हा परिषद