शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३५ महसूल मंडळातील संत्रा फळबागेला विम्याचे कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 16:36 IST

वाशिम जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा, डाळिंब व लिंबू या फळपिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये २०१९-२० राबविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.

वाशिम - जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा, डाळिंब व लिंबू या फळपिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये २०१९-२० राबविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. मृगबहार संत्रा फळपिकाकरीता जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांचा समावेश असून, शेतक-यांना १४ जूनपर्यंत नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मृगबहार संत्रा फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस व मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलू बाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु. व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे व येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ७७ हजार रुपये असून शेतकºयांनी केवळ ३ हजार ८५० रुपये विमा हप्ता भरावयाचा असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. मृगबहार डाळिंब पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी आसरा, राजगाव व पार्डी टकमोर, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, आसेगाव, शेलूबाजार, कवठळ, धानोरा व पाडीर्ताड, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मानोरा तालुक्यातील उमरी बु. या ११ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात डाळिंब या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी १ लक्ष २१ हजार रुपये असून शेतकºयांना केवळ ६ हजार ५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. लिंबू पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ६६ हजार रुपये असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता प्रतिहेक्टर ३३०० रुपये इतका आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना संत्रा व लिंबू पिकासाठी १४ जून २०१९ तर डाळिंब पिकासाठी १५ जुलै २०१९ पर्यंत विमा हप्ता भरून सहभागी होता येईल. विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम