शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची माहिती देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 19:03 IST

Tuberculosis News क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती दरमहा सादर करावी, अशा सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाने सोमवारी दिल्या.

!वाशिम : खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती दरमहा सादर करावी, अशा सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाने सोमवारी दिल्या.केंद्र सरकारच्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होवून त्याला उपचार उपलब्ध करणे बंधनकारक केले आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे अशा रुग्णांची नोंद बंधनकारक केली असून क्षयरुग्ण नोंदणीसाठी खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा ई-मेलवर दरमहा पाठविणे बंधनकारक आहे.खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुविधा, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर (सर्व बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सुविधा) आणि क्षयरोगाची औषधी विकणारे सर्व औषधी विक्रेते यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे क्षयरुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे. दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास त्या व्यक्तीला संशयित क्षयरुग्ण समजण्यात यावे, क्षयरुग्णांची माहिती दरमहा सादर करावी अशा सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाने दिल्या.

 नोंदणी न केल्यास कारवाईज्या प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालये, औषधी विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाही, अशा संस्था अथवा व्यक्तीला क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवून ते भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५) च्या कलम २६९ आणि २७० नुसार कार्यवाहीस पात्र आहेत. या कलमांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान ६ महिने ते २ वर्षेपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा, रुग्णालये, उपचार करणारे सर्व पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर आणि क्षयरोगाची औषधी विकणारे सर्व औषधी विक्रेते यांनी १ जानेवारी २०२१ पासून निदान झालेल्या, उपचार घेणाऱ्या, औषधे घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी जिल्हा क्षयरोग कार्यालयास करावी, नोंदणी न करणाºयाविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य