वाशिम: पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीवर लाल्या, मर, बोंड अळी आणिपांढरी माशी या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादनहीनिम्म्यापर्यंत घटण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हाप्रकार असल्यामुळे कृषी विभागाकडून शेतकºयांना तातडीने मार्गदर्शन मिळणेआवश्यक आहे.सुल्तानी संकटांनी आधीच शेतकरी पिचला जात असताना अस्मानी संकटांनीही त्याचापिच्छा पुरविला आहे. पावसाच्या अनियमितेने शेती उत्पादनावर परिणाम झाला असतानाआता तूर आणि कपाशीवर शेतकºयांचा आशा लागून आहेत; परंतु यामधील कपाशीच्यापिकांवर किडींचा प्रकोप झाला आहे. मर रोगामुळे कपाशीची झाडे सुक त असून, रोगअसलेली झाडे उपटून काढण्याशिवाय यावर पर्यायच नाही. त्याशिवाय लाल्या, पांढरीमाशी आणि बोंड अळीच्या प्रादूर्भावामुळेही हे पिक मोठ्या संकटात सापडले आहे.प्रत्यक्षात शेतकºयांनी पेरलेले कपाशीचे बियाणे हे देशी किंवा गावराण नसून,अधिक उत्पादन देणारे आणि किड प्रतिबंधक असलेल्या बी. टी. वाणाचे आहे. त्यामुळेया वाणाच्या पिकावर बोंड अळीसारख्या किडीचा प्रादूर्भाव होणेही ही आश्चर्याचीबाब आहे. आता या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसत असल्याने शेतकºयांनीघेतलेले बी. टी. बियाणे हे निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट असल्याची दाट शक्यतानिर्माण झाली आहे. कपाशीवर सर्वाधिक पांढºया माशीचा प्रादूर्भाव दिसत असून,यावर नियंत्रणासाठी शेतकरी किटकनाशकांची फवारणी करीत असले तरी, त्याचा काहीचपरिणाम किडीवर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कृषी विभागाने या रोगावरनियंत्रणासाठी शेतकºयांना तातडीने सखोल मार्गदर्शन करून त्याची समस्या दूरकरण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वाशिम जिल्ह्यात कपाशीवर किडींचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:59 IST
कपाशीवर लाल्या, मर, बोंड अळी आणि पांढरी माशी या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादनही निम्म्यापर्यंत घटण्याची भिती निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात कपाशीवर किडींचा प्रादूर्भाव
ठळक मुद्दे पांढरी माशी, बोंड अळी, मर, लाल्याचा प्रकोप