शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर 'अपलोड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:13 IST

१ लाख ५ हजार शेतकºयांच्या बँकांमधील कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील १ लाख ५ हजार शेतकºयांच्या बँकांमधील कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली असून, १० फेब्रुवारीपासून बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने आधार पडताळणी केली जाणार असून ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली जिल्हाभरात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात असून या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वाशिम जिल्ह्यात त्यापुर्वीच १ लाख ५ हजार शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.दरम्यान, सोमवारपासून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या संबंधित बँकांच्या शाखा फलकावर आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या दर्शनी भागात लावल्या जाणार आहेत. सोबतच विविध बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांवर बायोमेट्रीक पद्धतीने कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपापल्या स्तरावर बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध केली आहेत.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५ हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या पिक कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या याद्या ठराविक पोर्टलवर अपलोड झाल्या असून आधार पडताळणी प्रक्रियेनंतर शासनाच्या पुढील आदेशावरून संबंधितांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. याअंतर्गत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत.- डॉ. दत्तात्रय निनावकरव्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी