शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग रूळावर, बेरोजगार झालेले हात पुन्हा कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:30 IST

Washim News परप्रांतीय मजूर, कामगारही परत आले असून, बेरोजगार हातांना काम मिळाले आहे.

- संतोष वानखडे   वाशिम : कोरोनामुळे लाॅकडाऊनदरम्यान ठप्प झालेले एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगधंदे सप्टेंबर महिन्यापासून पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. परप्रांतीय मजूर, कामगारही परत आले असून, बेरोजगार हातांना काम मिळाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जून या दरम्यान उद्योगधंदे ठप्प होते. जिल्हयात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, अमानी (ता. मालेगाव), मानोरा येथे एमआयडीसी क्षेत्र आहे. रिसोड येथे एमआयडीसी क्षेत्र अद्याप नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीत वाशिम जिल्हा तसा मागास म्हणून ओळखला जातो. वाशिम येथील एमआयडीसी क्षेत्रात फारशा भाैतिक सुविधा  उपलब्ध नसल्याचा फटका उद्योग सुरू होण्यावर होत आहे. यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून उद्योग क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींशी दोन हात करीत एमआयडीसीतील लघुउद्योग व अन्य मोठ्या उद्योगधंद्यांची सध्या वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने या क्षेत्राला जवळपास साडेसात हजार कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जून महिन्यापर्यंत मागणी, कामगारांचा अभाव, कच्च्या मालाची कमतरता, वाहतूक व्यवस्था आदी अडचणींमुळे उद्योग प्रभावित होते. अनलाॅकच्या टप्प्यात कृषीआधारीत उद्योगांमध्ये गती आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जवळपास ११०० परप्रांतीय मजूर, कामगार परतले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

जिल्ह्यात  7500 कोटींचा फटका बसला

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. एप्रिल ते जून या महिन्यात एमआयडीसी क्षेत्रातील व अन्य लहान, मोठे उद्योग प्रभावित होते. या दरम्यान जिल्ह्यातील उद्योग जगताला जवळपास ७,५०० कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMIDCएमआयडीसीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक