शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:38 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे. सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीताना सद्यस्थितीत ९४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पेरणीचा समावेश आहे.मागील तीन वर्षांत यंदा प्रथमच जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला, तर विहिरी, कूपनलिकांची पातळीही वाढली. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाची सोय झाली. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने सुमारे ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन केले. त्यात हरभºयाचे सरासरी क्षेत्र ६२३९२ हेक्टर, तर गव्हाचे क्षेत्र २८ हजार हेक्टर होते. यामध्ये हरभरा पिकाची पेरणी ही नियोजित क्षेत्रापेक्षा ७ हजार हेक्टर क्षेत्राने वाढली. सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी सुरू असून, जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गळीत धान्याबाबत शेतकरी यंदाही उदासीन असून, यंदा ५१४ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी कृषी विभागाकडून नियोजित करण्यात आली होती. त्यात करडईचे क्षेत्र ३६८ हेक्टर अपेक्षीत असताना केवळ २९.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, सुर्यफुलाचे क्षेत्र २२ हेक्टर नियोजित असताना केवळ ५.२ हेक्टर, तर इतर गळीत पिकांचे नियोजित क्षेत्र १२४ हेक्टर असताना अवघ्या २.५ हेक्टर  इतर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष ३७.१ हेक्टर क्षेत्रावरच गळीताची पेरणी झाली. हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या तुलनेत १ टक्काही नाही.  रब्बी ज्वारीच्या पेऱ्यात घटजिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने १३९७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन केले होते; परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. यंदा गत आठवड्यापर्यंत केवळ ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. वन्यप्राण्यांची भिती आणि पिकासाठी लागणाºया खर्चाच्या तुलनेत बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी या पिकाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी