शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:20 IST

कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसत आहे. यंदा ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतील आकडेवारीवरून ही बाब उघडकीस आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात यंदा शोधलेले २१ कुष्ठरुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरोगी आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवयंदाच्या शोध मोहिमेत ८.१३ लाख लोकांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसत आहे. यंदा ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतील आकडेवारीवरून ही बाब उघडकीस आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात यंदा शोधलेले २१ कुष्ठरुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरोगी आहेत. जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत १ हजार ४१ चमूंनी  जिल्ह्यातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येपैकी ८ लाख १३ हजार ६७८ लोकांची तपासणी करण्यात आली असून, यात ३ हजार ७७७ संशयित रूग्ण आढळले. त्यापैकी २१ जणांना कुष्ठरोगाची लागण झाली असून, यामध्ये सांसर्गिक प्रकारातील ८ आणि असांसर्गिक प्रकारातील १३ रुग्णांचा समावेश आहे. गतवर्षी या मोहिमेत १० लाख ३५ हजार ७०६ लोकांची तपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष कुष्ठरोग झालेले १२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये ८१ सांसर्गिक प्रकारातील, तर ४६ असांसर्गिक प्रकारातील आहेत. त्यामुळे २०१६ मधील  १२७ आणि यंदाच्या शोध मोहिमेतील २१ रुग्ण मिळून एकूण १४८ कुष्ठरुग्ण जिल्ह्यात असले तरी, प्रत्यक्षात उपचाराखाली १०५ रुग्ण आहेत. त्यावरून अद्यापही कुष्ठरोग निर्मुलनाबाबत जनताच गंभीर नसल्याचे दिसत आहे.   वाशिम जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण आरोग्य प्रशिक्षण केंद्र नागपूरचे सहाय्यक संचालक तथा राज्यस्तरीय झोलन अधिकारी डॉ. विजय डोईफोडे,  वाशिमचे सहाय्यक संचालक डॉ. अश्विनकुमार हाके, अवैद्यकीय सहाय्यक जे. आर. ठाकरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक ए. एस. लोणारे यांच्या मार्गदर्शनात कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.