शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा! चालक, वाहकांसाठी एसटी महामंडळाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:25 IST

...या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.

वाशिम : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यासह विविध योजनांचीही अंमलबजावणी केली जाते. याच अंतर्गत महामंडळाकडून चालक, वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.

चालक, वाहकांना मिळणार २०%  प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षकांकडून आर्थिक ताळेबंद तपासला जाईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जेवढे अधिक उत्पन्न मिळाले, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक, वाहकांना (प्रत्येकी १० टक्के) विभागून दिली जाईल.

विविध आव्हाने पार करत सेवा- उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता ही योजना एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

- मागणीच्या तुलनेत अपुरी बससंख्या, मोडकळीस आलेल्या बसेस, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आदी अनेक आव्हाने पार करत, एसटीकडून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिक अमृत योजना, महिला सन्मान योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षवेधी भर पडली आहे.

- तथापि, काही चालक-वाहकांकडून प्रवासी संख्या वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बस थांब्यावर न थांबता थेट निघून जात असल्याच्या तक्रारी एसटीकडे प्राप्त होतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विशेष परिश्रम घेऊन चालक, वाहकाने एसटीच्या उत्पन्नात भर टाकल्यास त्यांनाही या योजनेतून लाभ होणार आहे.  

काय आहे योजना?योजनेचा कालावधी हा ३१ दिवसांचा राहणार आहे. उत्पन्नाचा तुलनात्मक आढावा घेण्यात येईल.    या दिवसांतील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती उत्पन्न वाढले, त्याचा हिशेब करून संबंधित वाहक-चालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जणार आहे.