शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सिलिंडरच्या किमतीत वाढ; ग्रामस्थांची सरपणाकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:16 IST

cylinder price Increase लोकांना सिलिंडर परवडणारे राहिले नसल्याने ते सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सतत वाढत आहे. महिनाभरात घरगुती सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी वाढून ७१४ रुपयांवर पोहोचली असताना सबसिडी मात्र केवळ ४.२१ रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर परवडणारे राहिले नसल्याने ते सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाढण्याची भीती आहे.कोरोना संसर्गामुळे ठप्प असलेले उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू झाले असले तरी, आर्थिक मंदीचे सावट कायमच असल्यामुळे रोजगाराची समस्याही भीषण रूप घेत आहे. अशात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. महिनाभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ७१४ रुपयांवर पोहोचली असून, सबसिडी मात्र केवळ ४.२१ रुपये एवढीच असल्याने गॅसचा खर्च वाढला आहे. अशात गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे. सरपणासाठी ग्रामस्थ  जंगलात वणवण भटकंती करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाची पर्यावरणयुक्त गाव संकल्पना अडचणीत येण्याची शक्यता आहे.  चूलमुक्त, धूरमुक्त अभियानाला तडा चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र, या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जुलै २०२० मध्ये घेतला होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी १०० कोटींची तरतूदही करण्यात आली. प्रत्येकी एक गॅसजोडणी वितरित करण्यासाठी प्रति जोडणीप्रमाणे लागणा‍ऱ्या ३८४६ रुपये खर्चाचा भार उचलण्याची तयारीही राज्य शासनाने केली होती. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी केली जात आहे. तथापि, आता गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने या अभियानालाही तडा जाण्याची भीती आहे.    

गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या किमतीत शंभर रुपयांची वाढ झाली. सबसिडी मात्र पूर्वीएवढीच केवळ ४.२१ रुपये दिली जात आहे. आधीच कोरोनामुळे काम मिळत नसताना सिलिंडरचा वाढता खर्च कोठून भरून काढावा, असा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही आता चुलीवर स्वयंपाक करीत असून, यासाठी जंगलात सरपणासाठी भटकंती करीत आहोत.-नर्मदाबाई खडसे, गृहिणी

टॅग्स :washimवाशिमCylinderगॅस सिलेंडर