कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे वसारी येथे सोयाबीन पीक शेतिदिनाचे आयोजन ०९ सप्टेंबरला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य मारोतराव लादे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, कृषी अधिकारी मालेगाव वी. पी. वाघ, तसेच मार्गदर्शक म्हणून कृषी विस्तारतज्ञ एस. के. देशमुख व कृषिविद्या तज्ञ टी. एस. देशमुख यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान माहिती करून पीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येकाने कृषी दूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले. तज्ञ मार्गदर्शक टी. एस. देशमुख यांनी सोयाबिन पारंपरिक पीक वान जे एस ३३५ मध्ये खोडमाशी व खोडकिडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सुधारित प्रतिकारक वाण वापर व शिफारस पीक लागवड तंत्रज्ञान वापर करावा असे सांगितले.
सुधारित तंत्र वापरातून सोयाबीन उत्पादकतेत वाढ शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST