शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दरोडाप्रकरणातील आरोपींना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:10 IST

राजू पाटील राजे यांच्या निवासस्थानी २५ डिसेंबर २०१० रोजी दरोडा पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरातील नोकराला शस्त्राचा धाक दाखवून व जबरीने घरात प्रवेश करून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन दरोडेखोर आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर यांनी शुक्रवार, १३ मार्च रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.प्राप्त माहितीनुसार, शहरातील लाखाळा परिसरातील रहिवासी राजू पाटील राजे यांच्या निवासस्थानी २५ डिसेंबर २०१० रोजी दरोडा पडला होता. घटनेच्या दिवशी राजे यांच्या घरी पाहुणे आलेले होते. त्यांच्यासोबत ते रात्रीच्या सुमारास विश्रामगृह येथे गेले होते. अशात रात्री २.३० वाजताच्या सुमारास ५ ते ७ दरेडोखोरांनी राजे यांच्या घराच्या पाठीमागील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला व नोकराला बांधून दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व महिलांना धाक दाखवून महिलांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने तसेच कपाटातील रोकड असा एकूण १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्व दरोडेखोर एम.एच. २१ व्ही. १९२५ या क्रमांकाच्या वाहनाने रिसोडमार्गे पसार झाले.सदर घटनेची फिर्याद राजू पाटील राजे यांनी शहर पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यावरून आरोपींवर कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यादरम्यान, पोलिसांनी तपासचक्र गतीने फिरवून आरोपी श्याम रामराव मानकर, साहेबराव विट्ठलराव वैद्य, विजयसिंग कृष्णसिंग भादा, ज्वालासिंग रामसिंग कलानी, दत्ता रौंदळे, किरणसिंग काकडसिंग जुन्नी व रविंद्र डोईफोडे अशा ७ आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्यातील ४ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. त्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपी रविंद्र डोईफोडे हा मयत झाला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीनंतर विद्यमान न्यायालयाने श्याम मानकर व साहेबराव वैद्य यांना भादवीचे कलम ३९५ मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा तीन महीने कारावास अशी शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी अन्य दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारपक्षा तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सुचिता कुलकर्णी (देशपांडे) यांनी काम पाहिले.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी