शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील सागवान वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:20 IST

वाशिम: तालुक्यातील शिरपुटी बिट अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील शिरपुटी बिट अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. वनविभागाच्या कर्मचाºयांचे मात्र, या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस ढासळणारा पर्यावरणाचा समतोल लक्षात घेऊन राज्य शासन ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असून, या अभियानांतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षांत २५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आता या वृक्षांचे संवर्धन होणे अपेक्षीत आहे; परंतु लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन होत नाहीच, उलट जंगलातील मोठमोठे वृक्ष तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. वाशिम तालुक्यातील शिरपुटी अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात हा प्रकार पाहायला मिळत आहे. या जंगलातील सागवान वृक्षांची कत्तल बिनदिक्कत करून पर्यावरणाचा ºहास करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना वनरक्षक किंवा इतर वनकर्मचारी जंगलाकडे फिरकून पाहत नाहीत. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणाºयांना मोकळे रान मिळाले आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगल