शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर; १६ दिवसांत १८ आरोपींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:56 IST

वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

६० हजारांचा ऐवज जप्त:लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी १८ आरोपींविरोधातही मुंबई जुगार अ‍ॅक्ट आणि दारूबंदी कायद्यान्वये कारवाईही करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वरली, मटका आणि जुगारासह गावठी, देशीविदेशी दारूच्या विक्रीचे अवैध धंदे जोरात सुरू करण्यात आले आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, या धंद्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने वरली, मटक्यासह अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. या अंतर्गत १ आॅगस्ट रोजी कारजां शहरात वरली मटक्यावर छापा टाकून रोख २३,८९० रुपयांसह ३८,८९० रुपयांचा ऐवज जप्त करीत पाच आरोपीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी  वाशिम शहरात सुरू असलेल्या वरली, मटक्यावर छापा टाकून रोख ४०६० रुपयांसह ८०६० रुपयांचा ऐवज जप्त  करीत आरोपीवर कारवाई करण्यात आली, तर मानोरा पोलिसांच्या हद्दीत कुपटा व भोयणी येथे १३ आॅगस्ट रोजी छापा टाकून रोख ६०३० रुपयांसह ९०३० रुपयांचा ऐवज जप्त करीत ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली, तसेच वाशिम मालेगाव मार्गावर वाशिम ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत  एका धाब्यावर १५ आॅगस्ट रोजी  ७३७२ रुपयांची देशीविदेशी दारू जप्त करीत एका आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस