लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील चोरद येथे ता २९ चे रात्री एक वाजताचे दरम्यान घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमर उर्फ सोनू विठ्ठल झाटे (१९) रा. चोरद यांनी तक्रार दिली की, फिर्यादीचे वडील विठ्ठल किसन झाटे (४५) रा. चोरद याने २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा वाजताचे दरम्यान पत्नी शोभा विठ्ठल झाटे (४०) हिची चारित्र्याच्या संशयावरून डोक्यावर व मानेवर लोखंडी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तसेच फिर्यादीच्या दोन्ही खांद्यावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विठ्ठल किसन झाटे याचे विरुद्ध कलम ३०२, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे,एपीआय अतुल तांबे, पीएसआय मंजुषा मोरे व चमूने घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली तसेच आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:23 IST