शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात चिमुकल्यांनी बनविले शेकडो ‘सिड्सबाॅल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:12 IST

Washim News : वाशिम आसपासच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओसाड जमिनीवर देशी सिड्स बाॅल फेकण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : घरच्या घरी बीजगोळे निर्मितीचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था,वाशिम व शासकीय सदस्य अंतग॔त तक्रार समिती, सामाजिक वनीकरण विभाग,  वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांच्या सहयोगाने उन्हाळाभर घरात राहुन चिमुकल्यांच्या माध्यमातून  राबविण्यात आला. या उपक्रमाव्दारे चिमुकल्यांनी माेठ्या प्रमाणात सिड‌्सबाॅल तयार केले आहेत. जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर रस्ते नवनिर्मितीच्या कामामुळे लाखो वृक्षाची कटाई करण्यात आली. यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे.  याकरिता बिजांचे गोळे तयार करून ते आसपासच्या परिसरात फेकले तर आनंद, मजा आणि पिकनिकही होईल आणि धरतीही फळफळेल सोबतचसारख्या मोबाइलच्या अतिवापराच्या दुनियेतून चिमुकली मातीशी पर्यायाने पर्यावरणाशी जोडली जातील या हेतूने  संपूर्ण नकोश्या असलेल्या उन्हाळ्यात  सदुपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात चिमुकल्यांनी प्रत्येकी शंभर बीजगोळे म्हणजे ‘सीडबॉल्स’ तयार केले असून पावसाळा सुरू होताच वनहद्दीत सिड्सबाॅल राजरत्न संस्थेकडून फेकले जाणार आहेत. वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी चिमुकल्यांना सिड्सबाॅल प्रशिक्षण देऊन सातत्याने बीजबाॅल निर्मिती करून घेतली. ज्यामध्ये चंदन, निंब, वड, पिंपळ, आंबा या सारख्या देशी वृक्षाचा समावेश आहे. परदेशी वृक्षावर आपल्याकडील पक्षी बसत नसल्याने व ते वृक्ष येथील मातीस पोषक नसल्याने देशी वृक्षलागवड, जतन संवर्धनावर पर्यावरणवाद्यानी भर द्यावा, असे आवाहन यावेळी वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी केले.वाशिम आसपासच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओसाड जमिनीवर देशी सिड्स बाॅल फेकण्यात येणार आहेत. मातीशी मनमुराद खेळत लाॅकडाऊनचा फायदा घेत घरात राहून  चिमुकल्यांनी तब्बल पाचशे बीजबाॅलची निर्मिती केली. यामध्ये  विधी मेश्राम, आरती नागूलकर,  श्रेयस काळबांडे,  ज्ञानेश्वरी नागूलकर या चिमुकल्यांचा समावेश होता. 

अशी झाली 'सीडबॉल्स निर्मीती'सीडबॉल्स' तयार करण्यासाठी माती, शेण, खत व देशी बियाणे वापरले गेले. एक दिवस आधी बियाण्यांना धुवून त्यांना स्वच्छ पुसले गेले. कोरडे करुन त्याला खत व शेणाच्या मिश्रणात मिसळून त्याचे गोळे  चिमुकल्यांनी तयार केले. 'सीडबॉल'मध्ये पोषक मुल्ये असल्यामुळे जमिनीत रुजेपर्यंत ते तग धरू शकतील यामधुन उगवलेले अंकुर भविष्यात महाकाय वृक्षात परिवर्तीत होऊन पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मदत होईल.

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण