श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थानवर हजारो भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: February 16, 2016 01:32 IST2016-02-16T01:32:05+5:302016-02-16T01:32:05+5:30

मानोरा येथे सेवालाल जयंती उत्साहात साजरी.

Hundreds of pilgrims visit the Shri Kshetra Pohdevi Institute | श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थानवर हजारो भाविकांची मांदियाळी

श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थानवर हजारो भाविकांची मांदियाळी

जगदीश राठोड / मानोरा: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हजारो भाविकांनी सोमवारी श्रीक्षेत्र पोहरादेवी संस्थानवर हजेरी लावून दर्शन घेतले. समाजाला परिवर्तनाची दिशा देणारा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा, दूरदृष्टीने क्रांतिप्रवण महापुरुष, सामाजिक व आद्गथक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाचे भाकीत करणारे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती सोमवारी सातासमुद्रापार पार पडली. बंजारा काशी पोहरादेवी ,गुत्ती बिलारी, कर्नाटक स्वर्णकोपा, मुंबई, नागपूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, एवढेच नव्हे, तर इतर देशात स्थायिक झालेले बंजारा बांधवांनीही विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या सेवाभावाची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान भागवत सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. संत सेवालाल महाराज यांच्या २७७ व्या जयंती निमित्त पहाटेच्या सुमारास ह्यजय सेवालालह्ण चा गजर करीत पालखी काढण्यात आली. पालखी निघण्यापूर्वी संपूर्ण गाव, तांडा, वाडा, वस्तीत स्वच्छता करण्यात आली. नंतर पालखीत बंजारा समाजाच्या पारंपारीक पध्दतीत पोशाख परिधान करुन सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग घेतला. तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ४0 ते ५0 हजार भाविकांनी संत सेवालाल महाराज समाधीचे, आई जगदंबा , संत रामराव महाराज, आदिंचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतला. यावेळी भोगभंडारा आडदास महंत कबीरदास महाराज यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी गायन करुन प्रसाद चढविला. यावेळी बंजारा समाजाचे टी.बी. आडे, बळीभाऊ राठोड, मिलिंद पवार, जितेंद्र महाराज, यासह मान्यवर उपस्थित होते. परिसरातील दापुरा, भुली, माहुली, हातना, पंचाळा, गादेगाव, वापटा, भोयणी, चोंढी, खापरी खंडाळा, पारवा, देवठाणा, एकलारा, सिंगडोह, शिंगणापूर, हळदा, जगदंबानगर, वागद तांडा, शेंदूरजना अढाव, गिराटा, कारपा, आसोला खुर्द, आमदरी, गव्हा, फुलउमरी, उमरी खुर्द, सोमेश्‍वरनगर, सोयजना, चिखली, बोरव्हा, सेवादासनगर, वरोली, कारखेडा, विठोली, आदिसह बंजारा तांडा, वाडी व वस्तीमध्ये सोमवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Hundreds of pilgrims visit the Shri Kshetra Pohdevi Institute