शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:33 IST

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २५ व २६ सप्टेंबर रोजीच्या परतीच्या पावसामुळे मारसूळ, इंझोरी, मोहरी यासह मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. इंझोरी परिसरात नदीकाठची शेतजमिन पिकांसह खरडून गेली.इंझोरी : २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान इंझोरी परिसरात परतीचा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारासदेखील जोरदार पाऊस झाल्याने इंझोरी परिसरातील नदी, नाले वाहते झाले. पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुनिता राठोड, बाळू राठोड, मधु काळेकर, देवानंद हळदे, मंगेश काळेकर, मधुकर हळदे, गजानन राठोड, भीमराव राठोड, कुंदन श्यामसुंदर, शमीन शहा, रूख्मिना पुंड, गणेश ढोरे, आनंद तोतला, युवराज वाघमारे, धनराज वाघमारे, पंजाब वाघमारे यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर अन्य शेतकºयांच्या शेतातील पिकांत पाणी साचले. विमा कंपनी व महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मोहरी : २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान तसेच २६ सप्टेंबरलादेखील जोरदार पाऊस झाला. या पावसाने उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे मोहरी परिसरातील नदी नाले व मोहरी येथील धरण पुर्ण भरले आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.मालेगाव : २६ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास परतीचा पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात मुख्यत्वेकरून मारसुळ भागात शेंगाचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असताना गत तीन, चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळा पडत असून त्याला काही ठिकाणी कोंब बाहेर येत आहे. पावसामुळे सात एकरातील सोयाबीनच्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहेत, असे मारसूळ येथील शेतकरी श्यामराव घुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी शेतात असेल तर ते पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे सोयाबीनला कोंब येणार नाहीत. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार असल्यास पंचनामे केले जातील.-शशिकिरण जांभरूनकर,तालुका कृषी अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस