रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; रुग्णांना मोजावे लागताहेत पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:39 AM2021-05-17T04:39:00+5:302021-05-17T04:39:00+5:30

फुप्फुसाच्या आजाराशी संबंधित जवळपास २० पॅकेजअंतर्गत कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्याची सुविधा आहे. सामान्य पॅकेज हे ...

Hospitals to ‘public health’; Patients have to pay money! | रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; रुग्णांना मोजावे लागताहेत पैसे!

रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; रुग्णांना मोजावे लागताहेत पैसे!

Next

फुप्फुसाच्या आजाराशी संबंधित जवळपास २० पॅकेजअंतर्गत कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्याची सुविधा आहे. सामान्य पॅकेज हे दहा दिवसांचे असून त्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागल्यास एक दिवसाच्या अंतराने या पॅकेजचे नूतनीकरणही करता येते. यामध्ये महागड्या इंजेक्शनचा खर्च मात्र रुग्णांनाच करावा लागतो. कोरोनासंदर्भाने किडनी व तत्सम आजारांसंदर्भातील पॅकेजही यामध्ये परवानगी घेऊन लागू करता येते, असे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक यांनी सांगितले.

जिल्ह्यात आजपर्यंत १५ मे २०२१ पर्यंत ३५ हजार २६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन शासकीय व चार खासगी दवाखाने मिळून केवळ ४०० जणांवरच जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात आले. त्यावर ५० लाखांपेक्षा अधिक खर्च झालेला आहे.

.................

१) महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रूग्णालये - ०६

एकूण कोरोनाबाधित - ३५२६३

कोरोनामुक्त - ३०२९५

मृत्यू - ३६६

सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण - ४६०१

योजनेचा लाभ घेतलेले रूग्ण - ४००

२) केवळ २० हजारांचे पॅकेज

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ २० हजारांचे पॅकेज असल्याने रूग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. शासनस्तरावरून व्यवस्थित धोरण आखल्या गेले नाही. त्यामुळेच प्रश्न उपस्थित झाल्याचेही काही डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

.....................

(बॉक्स)

जनआरोग्य मित्रांकडे करता येते नोंदणी

योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात सहाही कोविड हाॅस्पिटलमध्ये जन आरोग्यमित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची मदत रुग्ण घेऊ शकतात. वेळप्रसंगी संबंधितांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र टाकल्यास योजनेमध्ये रुग्णाचा अंतर्भाव करण्यास हे आरोग्यमित्र मदत करतात. दरम्यान, खासगी रुग्णालयांकडून काही अडचणी येत असल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार किंवा संपर्क साधता येतो. जिल्हाधिकाऱ्यांकडेही ई-मेलद्वारे तक्रार करता येते.

४) ... तर करा तक्रार (बॉक्स)

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट तथा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रूग्णालयांनी योजनेंतर्गत रुग्णास उपचार नाकारल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकीत्सक किंवा योजनेच्या जिल्हा समन्वयाकडे तक्रारी करता येतात.

.................

तक्रारींचे प्रमाण नगण्य

जिल्ह्यात केवळ चार खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अनेकांना या योजनेतून मोफत उपचार मिळतात, याचीही कल्पना दिली जात नाही. यामुळेच तक्रारींचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

Web Title: Hospitals to ‘public health’; Patients have to pay money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.