शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

मंगरुळपीरच्या डाळिंबाची हाँगकाँग वारी

By admin | Updated: November 7, 2014 01:11 IST

विदर्भासह मराठवाड्यातही मागणी : एकरी ३0 टन डाळिंबाचे उत्पन्न.

साहेबराव राठोड / मंगरुळपीरतीन वर्षांपूर्वी चार एकरात डाळिंबाची लागवड केली. गारपिटीने त्यावर गतवर्षी संकट आले. तरीही न डगमगता जवळपास नष्ट झाल्यात जमा झालेल्या डाळिंबाच्या झाडांना पुनरुज्जीवन दिले व सहसा शेतकरी टाळणारा डाळिंबाचा आंबीया बार घेत युवा शेतकरी शरद प्रतापसिंग बाबर यांनी पडतीच्या काळात आपल्या मालाला चांगला भाव मिळवून घेतला. एवढेच नाही तर त्यांच्या कल्पक व नियोजनपूर्ण शेतीमुळे त्यांच्या मालाला हाँगकाँगच्या बाजारपेठेची मागणी आली. परंपरागत वीटभट्टीच्या व्यवसायाला फाटा देत मंगरुळपीरच्या बाबरे परिवाराने शेतीव्यवसायाचा मार्ग निवडला. तीन भावंडांच्या २५ सदस्यांच्या एकत्र कुटुंबात जवळपास १२0 एकर शेती. शेतीचा व्यवसाय मुख्य असला तरी कुटुंबातील युवा पिढी चांगली शिक्षित. सातत्याने कल्पकतेने शेतीचा ध्यास घेतलेल्या बाबरे परिवारातील प्रतापसिंग बाबरे यांच्या शरद बाबरे या बी. एस. सी. अँग्री झालेल्या युवा शेतकरी मुलाने तीन वर्षांपूर्वी मंगरुळपीर तालुक्यातीलच मंगळसा येथील डिगांबर गिरी व वनोजा येथील अनिल राऊत या डाळिंब शेतीचा चांगलाच अनुभव असलेल्या शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनातून मंगरुळपीर-कारंजा मार्गावरील चार एकर शेतीत भगवा गुटीकलम या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. यावेळी त्यांना सध्या तोड सुरु असलेल्या चार एकराच्या डाळिंब शेतीतून १२0 टन डाळिंबाचे उत्पादन अपेक्षीत आहे. मृग बार घेणार्‍या शेतकर्‍यांना एकीकडे ४२ ते ४५ रुपये प्रती किलोचा भाव मिळालेल्या इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत आंबीया बार घेतल्याने बाबरे यांना ६७ रुपये किलोचा भाव मिळाला. आपल्या शिक्षण व संपर्काच्या बळावर शरद बाबरे यांनी परदेशातील हाँगकाँगच्या बाजारपेठेत आपल्या डाळिंबाला मागणी होऊ शकते का, याची चाचपणी केली. त्याचा परिपाक म्हणून शरद बाबरेंचे आंबीया बाराचे डाळिंब हाँगकाँगच्या दिशेने कूच करीत आहे. याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील नागपूर व मुंबईच्या बाजारपेठेतही बाबरेंच्या डाळिंबाला चांगली मागणी असल्याचे ते म्हणाले.