शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर; धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:02 PM

नियम न पाळणाºया नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी शनिवारी केलीे.

लोकमत न्युज नेटवर्क मालेगाव : होम क्वारंटीन, गृह विलगीकरण व थ्रोट स्वॅब नमुने घेतल्यानंतर घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शहरातील अनेकजण घराबाहेर पडत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता बळावली आहे. नियम न पाळणाºया नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी शनिवारी केलीे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया नागरिकांचीही टेस्ट  (तपासणी) केली जात आहे. या टेस्टचा  अहवाल येईपर्यंत या नागरिकांना होम क्वारंटीन म्हणून घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येतो. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत : ला एकटे करून घ्यावयाचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. मात्र अनेक नागरिक हे टेस्ट झाल्यानंतर शहरात बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. अशा लोकांवर प्रशासन व पोलीस विभागाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. होम क्वारंटीन असलेले नागरिक घराबाहेर फिरत असल्याचे पाहून मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी ओपीडी   बंद केली होती. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेली, टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतू कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. मालेगावातील काही नागरिक गृह विलगीकरणात असूनही, बरे वाटते म्हणून घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. संभाव्य धोका ओळखून नियम न पाळणाºया अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांनी केली.

शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात मालेगाव शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यात ६० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ व्यवस्थित होणेही गरजेचे आहे. अनेक लोक परस्पर टेस्ट करतात आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतात, याची माहिती प्रशासनाला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांचे ‘कॉन्टॅक्ट’ शोधण्यास अडचणी निर्माण होऊन पर्यायाने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो. याबाबत नागरिकांसह प्रशासनही सतर्क असणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम