कोरोना संसर्गाने हिरावला निराधारांचा बाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:43 IST2021-03-17T04:43:05+5:302021-03-17T04:43:05+5:30

गजानन सरोदे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर अमरावती तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गजानन सरोदे ...

Hiravala father of destitute due to corona infection | कोरोना संसर्गाने हिरावला निराधारांचा बाप

कोरोना संसर्गाने हिरावला निराधारांचा बाप

गजानन सरोदे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर अमरावती तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गजानन सरोदे हे मुळचे मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहिवासी. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी ते व्यवसायासाठी कामरगावात आले आणि कायमचे कामरगावचे रहिवाशी झाले. कामरगावात त्यांनी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. त्यांना समाजकार्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी परिसरातील अनेक निराधारांना आधार दिला. तर रस्त्याने फिरणाऱ्या मनोरूग्णांना अनाथआश्रमात हक्काची जागा मिळवून दिली. शिवाय काही महिला मनोरूग्णांना देखील महिला आश्रमात दाखल केल्याने त्यांच्यावरील संभाव्य अत्याचार टळले. असा हा निराधारांचा बाप १५ मार्च रोजी हिरावला. त्यांच्या निधनाची बातमी कळताचा अनेकजण जागच्याजागीच स्तब्ध झाले. शिवाय कामरगाववासीयांवर शेाककळा पसरली तर मित्रपरिवारही हळहळला.

Web Title: Hiravala father of destitute due to corona infection