शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नव्या वाहनांना ‘हाय सिक्यूरिटी’; १ एप्रिलपूर्वीची वाहने सुरक्षा कक्षेबाहेबरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:07 PM

नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चोरट्यांपासून सुरक्षा आणि नियमबाह्य पद्धतीने लावण्यात येणाऱ्या नंबर प्लेटच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र उत्पादित होणाºया नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.वाहन चोरी, अपघात व गुन्ह्यांची उकल करताना येणाºया अडीअडचणी दूर करण्यासाठी वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. उच्च तंत्रज्ञान वापरून बनविण्यात येणाºया या नंबर प्लेटवर इलेक्ट्रॉनिक चिप तसेच सेन्सॉर असणार आहे. यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती असणार आहे.सेन्सॉरमुळे वाहनाचा गैरवापर होत असल्यास संबंधित यंत्रणेला त्याची माहिती लगेचच प्राप्त होणार आहे. चोरट्याने वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर लगेचच प्राप्त होणार आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास लवकर लागण्यास मोठी मदत मिळेल. मात्र, १ एप्रिलपासून उत्पादित होणाºया नव्या वाहनानाच ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली असून जुनी वाहने त्यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे १ एप्रिलपूर्वीची जुनी वाहने चोरीला गेल्यास किंवा वाहनांचा अपघात झाल्यास त्यावर कुठलाही ठोस पर्याय शोधण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.‘इन्फ्रारेड’ पद्धतीने ‘हाय सिक्युरीटी नंबर प्लेट’वरील सांकेतिक माहिती पाहण्यासाठी पोलीस आणि आरटीओजवळ ‘स्कॅनर’ची सुविधा असणार आहे. दुरवरूनही ही नंबर प्लेट स्कॅन करता येणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची माहिती देखील तातडीने मिळणार असल्याने पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस