शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाची धडक; एकजण जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:05 IST

या अपघातात लोणी, ता. रिसोड येथील ग्यानुजी लोडूजी घायाळ (शावकार) हे जागीच ठार झाले; तर गंधारी, ता. लोणार येथील शिवाजी रुपचंद राठोड हे गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर  जैन : रिसोडकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात लोणी, ता. रिसोड येथील ग्यानुजी लोडूजी घायाळ (शावकार) हे जागीच ठार झाले; तर गंधारी, ता. लोणार येथील शिवाजी रुपचंद राठोड हे गंभीर जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप वाहनाने पुढे जाऊन भाजीपाला वाहतूक करणाºया आॅटोलाही जबर धडक दिली. हा अपघात १६ फेब्रूवारी रोजी घडला.प्राप्त माहितीनुसार, मृतक ग्यानुजी घायाळ व शिवाजी राठोड हे विनाक्रमांकाच्या दुचाकी वाहनाने रिसोडवरून मालेगावकड चालले होते. यादरम्यान मजूर घेऊन मागून येणाºया पिकअप (क्रमांक- एम.पी. ३६ जी ०८०२) वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात ग्यानुजी घायाळ यांच्या मेंदूला मार लागल्याने ते जागीच ठार झाले; तर शिवाजी राठोड हे जखमी झाले. या अपघातानंतर न थांबता पिकअप वाहनचालकाने आपले वाहन शिरपूरमध्ये घुसवून भाजीपाला घेऊन जाणाºया एका आॅटोला धडक दिली. आॅटो उलटल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले. दरम्यान, गावातील देशमुख गल्ली येथे उपस्थित संभाजी नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन थांबविले व चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. 

रुग्णवाहिकेच्या चालकांचा मृतदेह उचलण्यास नकार

अपघात घडल्यानंतर शिरपूर आरोग्यर्धिनी केंद्राची रुग्णवाहिका व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस घटनास्थळी पाचारण करण्यात आले; मात्र दोन्ही रुग्णवाहिकेच्या चालकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता नकार दिला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर आरोग्यवर्धिनी केंद्राच्या रुग्णवाहिकेव्दारे मृतदेह मालेगावला हलविण्यात आला. ही बाब लक्षात घेता किमान तालुकास्तराव स्वतंत्र शववाहिका उपलब्ध करावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेराव यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातShirpur Jainशिरपूर जैन