शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 17:35 IST

गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला. दरम्यान रिसोड तालुक्यातील मोप, वाकद, बाळखेड येथे शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचे नुकसानही झाले.गतवर्षी पावसात सातत्य नसल्याने खरीप हंगामात शेतकºयांना समाधानकारक उत्पन्न घेता आले नाही. गतवर्षीची कसर भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकरी  मे महिन्यापासूनच शेती मशागतीच्या कामाला लागले होते. यावर्षीही मान्सूनचे उशिराने आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने सुरूवातीला वर्तविला होता. जिल्ह्यात १० ते १४ जून या दरम्यान दमदार पाऊस झाल्याने जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. यावर्षी ४ लाख ६ हजार २३४ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. २६ जूनपर्यंत जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्या. १६ जूनपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील बियाणे उगवले नाही तसेच काही निकृष्ट दर्जाचे बियाणेदेखील उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग व महाबिजच्यावतीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, २५ जून रोजीच्या रात्री जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झाला.  विशेषत: रिसोड तालुक्यातील वाकद, मोप, बोरखेडी, बाळखेड या परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. काही शेती खरडूनही गेली.  त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणीही शेतकºयांनी केली. त्यानंतर २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारासही जिल्ह्यात पाऊस झाला. २७ जूनच्या रात्रीदरम्यान कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी तर शेतकºयांनाही दिलासा मिळाला.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस