शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

वाशिम : देपूळ येथे आरोग्य पथक दाखल; त्वचाविकार ग्रस्तांवर केले उपचार, श्र्वानांचेही लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 20:02 IST

‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांवर उपचार व श्वानांचे लसीकरण केले.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तामुळे आरोग्य विभागाला आली खडबडून जागआरोग्य विभागाचे पथक देपूळ येथे डेरेदाखलनागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम): गावातील पाळीव आणि मोकाट अशा अनेक श्वानांना गेल्या अज्ञात त्वचाविकाराची लागण होऊन त्यांच्या अंगाला मोठमोठ्या जखमा झाल्या. हा संसर्ग काही गावक-यांनाही जडून ३० ते ४० नागरिकांच्या अंगाला खाज सुटली. यासंबंधी ‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांवर उपचार व श्वानांचे लसीकरण केले.

देपूळ येथे वावरणा-या श्वानांच्या अंगावरील केस जावून त्याठिकाणी मोठमोठ्या जखमा झाल्या असून त्यातून रक्तस्त्राव देखील होत आहे. त्यामुळे ही कुत्री पिसाळण्याची शक्यता वर्तविली जात होती.  दुसरीकडे गावातील काही नागरिकांच्या अंगालाही वेगळ्याच प्रकारची खाज सुटली असून श्वानांच्या संसर्गामुळेच हा आजार जडल्याची भिती गावात वर्तविली जात होती. दरम्यान, याप्रकरणी ‘लोकमत’ने सर्वंकष वृत्त प्रकाशित करताच पार्डी टकमोर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणा-या कळंबा महाली आरोग्य उपकेंद्राची चमू आणि पशुवैद्यकीय दवाखाना, वाराच्या पथकाने गावात येऊन त्वचाविकाराने त्रस्त ३० नागरिकांवर उपचार केला. तसेच पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.के.वानखेडे यांनी १० ते १५ श्वानांचे लसीकरण केले. आरोग्य विभागाच्या पथकामध्ये आरोग्य सेवक आर.व्ही.वाघ,  एन.डी.बिटोडे, आशा लंका गंगावणे, वर्षा जोंधळे आदिंचा समावेश होता.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य