शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश डावलून दुपारीच दिली शाळेला सुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:45 IST

शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला.

ठळक मुद्दे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्याच्याच्याही सूचना २२ जून रोजी मुख्याध्यापकांच्या बैठकित गटशिक्षणाधिकारी मंजूषा कौशल यांनी दिल्या होत्या.  निर्देशांकडे दुर्लक्ष करून शेंदुरजना मोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मर्जीनुसार शाळा दुपारच्या सुमारास बंद केली.त्यानंतर कौशल यांनी शाळा खरोखरच बंद आहे का, याची चाचपणी केली असता शाळा बंद असल्याचे निष्पन्न झाले.

- धनंजय कपाले   वाशिम : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक वाटावा, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उल्हासात व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. याशिवाय पहिल्या दिवशी कुठलेही कारण न देता जिल्हाभरातील सर्व शाळा दिवसभर उघड्या ठेवण्याच्या सुचना त्या-त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. असे असताना शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला.शाळा सुरू होण्याच्या एक दिवसआधी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे, शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना होत्या. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शाळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवणे, शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरीचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करणे, मोफत पुस्तक वितरण आदी कार्यक्रम आयोजित करणे, अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्याच्याच्याही सूचना २२ जून रोजी मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकित गटशिक्षणाधिकारी मंजूषा कौशल यांनी दिल्या होत्या. मात्र, गटशिक्षणाधिकाºयांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून शेंदुरजना मोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मर्जीनुसार शाळा दुपारच्या सुमारास बंद केली. दरम्यान, या गंभीर प्रकाराची माहिती गावकºयांनी केंद्रप्रमुख जायभाये, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी मंजूषा कौशल यांना दिली. त्यानंतर कौशल यांनी शाळा खरोखरच बंद आहे का, याची चाचपणी केली असता शाळा बंद असल्याचे निष्पन्न झाले. घडलेल्या या एकूणच प्रकारामुळे पालकांमधून संतप्त सूर उमटत आहे.   

 शेंदुरजना मोरे येथील मुख्याध्यापकांनी दुपारी २ वाजेपर्यंतच शाळा घेतली. त्यानंतर ते शाळा बंद करून घरी गेले. हा प्रकार गंभीर असून सर्व मुख्याध्यापकांना शाळेच्या वेळेमध्ये कुठलाही बदल करायचा नाही, अशा स्पष्ट सुचना दिल्या होत्या. याउपरही संबंधित मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले नाही. यासंबंधी शेंदुरजना मोरे येथील शाळेचा अहवाल मागितला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. - मंजूषा कौशल, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मंगरूळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरSchoolशाळा