लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा ते वाशिम रस्त्यावरील सोहळ फाट्यानजिक परस्परांविरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ४ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर येथून कारंजाकडे आणि कारंजावरून मंगरूळपीरकडे जात असलेल्या एम एच ३० ए.ए. ५४२० आणि एम एच २२ यू ६६१२ या क्रमांकाच्या दोन चारचाकी वाहनांची सोहळ फाट्यानजिक समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात उदय गुल्हाने नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सुशिला गुल्हाने यांच्यासह अन्य एकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातग्रस्तांना दवाखान्यात पोहचविण्याकरिता शंकर रामटेके यांनी मदत केंली.
दोन वाहनांची समोरासमोरर धडक; एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:52 IST