मानोरा : तालुक्यातील डोंगराळ टेकडी भागातील वापटा शेतशिवारात बहरलेले भुईमुंगाच्या पिकामुळे शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. मात्र वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी शेतात येवून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होवुन उत्पादनात घट येण्याबाबत काळजीत पडला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ निर्माण झाली. शेतातील विहीरीत पाणीसाठा असल्यामुळे तसेच नदी नाल्यामधील पाण्याच्या पातळीत वाढ असल्याने रब्बी हंगामात बहूतांश शेतकऱ्यांनी भुईमुंग पिकांची पेरणी केली आहे. यावर्षीच्या उन्हाळा भयानक असल्याने पिक निघेपर्यंत पाणी पिकांना पुरेल याबाबत शेतकऱ्यांनी काळजी पडली आहे.कारण भुईमुंग हे पिक मे व जुन्या अखेरीस काढणीला येणार आहे. तसेच शेतातील उभ्या पिकाची नासाडी करुन ये-जा करीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.
वन्यप्राण्यांव्दारे पिकांची नासाडी
By admin | Updated: April 23, 2017 13:38 IST